अडचणीमधून मार्ग काढण्याच्या काही खास पद्धती जरुर वाचा I Problem Solving Techniques in Marathi

Problem Solving Techniques in Marath

अडचणीमधून मार्ग काढण्याच्या काही खास पद्धती जरुर वाचा I Problem Solving Techniques in Marathi

अगदी लहानपणापासून ते आजपर्यंत आपल्या आयुष्यात अनेक अडचणी, संकटे आलीत. जसे परीक्षेची, नोकरी, व्यवसाय, लग्न यासारख्या अनेक समस्या, चिंता अडचणी सर्वच अनुभवत असतात. आपल्यामध्ये असा एकपण नसेल ज्याला आजपर्यंत आयुष्यात एकही अडचण, समस्या आली नसेल.

मात्र वेळेनुसार सर्व अडचणी, समस्या यांच निराकरण होत असते. मग नेमका प्रश्न उरतो तो ह्या अडचणी, समस्या, दुःख नेमकं आहे तरी काय.

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोकं आहेत जे त्यांच्या कठीण काळात संकटांना, अडचणीला समोर बघून घाबरून जातात. स्वतःमधील आत्मविश्वास गमावून बसतात. मात्र काही लोकं अशीही असतात जी अश्या संकटांना न घाबरता त्यांचा सामना करतात, अश्या वेळी ते स्वतःला आणखी मजबूत बनवतात आणि संकटाचा, अडचणीचा सामना करतात.

काही लोकांना येणाऱ्या अडचणी यांना कसं हाताळायचं याच ज्ञान असते, तर काहीजवळ ते नसते. अर्थातच अडचणीसोबत कसं लढावं हे कुठल्याच शाळेत शिकवल्या जात नाही तर ते स्वतःच शिकावं लागतं, तरच आयुष्यात यशस्वी, आनंदी होता येते. आज त्याविषयीच इथं सांगणार आहे.

अडचणी, संकटे याचा सामना करायच्या आधी त्यांना समजून घेणं खूप महत्वाचं असते. बऱ्याच वेळा लोकं अडचणी निर्माण होण्याच कारण न शोधताच तिच्याशी लढायला सुरुवात करतात आणि मग त्यामध्येच भटकत राहतात.

अडचणी वर मात करायची असेल तर आधी निर्माण झालेल्या परिस्थितीचा मनापासून स्विकार करणे. जो पर्यंत आपण तिचा स्विकार नाही करणार तोपर्यंत आपण त्यामधून मार्ग काढू शकणार नाही.

खालील 6 गोष्टीचा अभ्यास करून आपण अडचणी, संकटे यामधून मार्ग काढू शकतो.


१. अडचणी, समस्या यांना व्यवस्थित समजून घ्या:

बऱ्याचवेळा अडचणी निर्माण झाल्यानंतर आपण गोंधळून जातो, कुठलाही विचार न करता आपण त्या अडचणी वर काहीतरी प्रतिसाद देऊन जातो. मात्र असे केल्याने ती अडचण कमी न होता आणखी वाढते  म्हणून आधी अडचण समजून घेणे खूप महत्वाचे आहे. अडचण समजून घेतल्यानंतरच आपल्याला कळेल की समस्या नेमकी किती मोठी आहे आणि त्यानुसार त्यावर उपाय करता येतील. जो पर्यंत एखाद्या अडचणीचे नेमकं कारण आणि स्वरूप आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण त्यावर कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही आणि घेतलाच तर तो अयशस्वी ठरण्याचे प्रमाण हे जास्तच असते. म्हणून कोणत्याही अडचणी, संकटावर React करायच्या आधी ते समजून घेणे खूप महत्वाचे असते.

२ अडचणी, संकटाकडे नव्या दृष्टीकोनातून बघा:

बऱ्याचवेळा आपण एखाद्या समस्येकडे भीतीच्या नजरेने बघतो त्यामुळे आपोआपच ती समस्या आपल्या समोर खूप मोठी बनून उभी राहते. त्यामुळे त्या समस्येला सोडावण्यासाठी आपण पात्र नाही किंवा आपल्याला ते नाही जमणार म्हणून आपण आधीच हार मानून घेतो. म्हणून कुठलीही समस्या, अडचण आल्यास त्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघा, त्यामध्ये कुठं तरी संधी दडलेली आहे या नजरेने बघा. असे केल्यास तुम्हांला त्या समस्येशी लढतांना नक्कीच आत्मविश्वास आणि आनंद सुद्धा मिळेल. आपण ज्या नजरेतून संकटे, अडचणी, समस्या यांना बघू त्या आपल्याला तश्याच दिसतील.

३.  अडचणीला अनुसरून विचार करा :

एखाद्या संकटाला, अडचणीला समोर पाहिल्यानंतर आपल्या मनात त्याक्षणापासून अनेक विचार येण्यास सुरुवात होते. त्यामधील अशे अनेक विचार असतात ज्याचा त्या संकटाशी काहीही संबंध नसतो आणि तरी सुद्धा आपण त्या विचारांना खतपाणी घालत असतो. 

आपण हे लक्षात घ्यायला हवं की आलेल्या संकटातून आपल्याला मार्ग काढायचा आहे, त्याच्याशी लढायचं आहे. त्यामुळे आलेल्या संकटाची माहिती घेऊन त्यानुसार नियोजन करा, संकटाचे गांभीर्य लक्षात आणि त्यानुसारच विचार करा. 

मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला खतपाणी घालत बसू नका. अडचणीशी निगडित सकारात्मक विचार करा आणि त्यावरच काम करा.

४. ऐका सर्वांचं मात्र करा तुमचंच:

आलेल्या अडचणीवर विचार करून आणि त्यावर काम करूनसुद्धा जेव्हा त्यामधून मार्ग निघत नसेल तर  आपण बऱ्याचदा इतरांचा सल्ला घेत असतो. यामध्ये आपण परिवारामधील लोकांचा, मित्रांचा ऑफिसमधील लोकांचा सल्ला आपण घेत असतो, पण इथं आपण एक लक्षात घ्यायला हवं की इतरांनी दिलेला सल्ला हा आपल्यावर बंधनकारक नसतो.

इतरांचे मत, सल्ले ऐकल्यानंतर तुम्ही तेच करा जे तुमच्यासाठी योग्य असेल कारण इतर लोकं हे त्यांच्याअनुभवानुसार त्यांचे सल्ले देत असतात मात्र तुमी तेच निवडा जे तुमच्यासाठी योग्य असेल.

जर तुम्ही असं केलं तर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि लढण्याची प्रेरणासुद्धा मिळेल.

५. परिणामांचा विचार करा :

बऱ्याच वेळा आपण निर्णय घेतो आणि त्यावर कृती करायला देखील सुरुवात करतो मात्र त्यामधून येणाऱ्या परिणामाचा आपण विचार करत नाही त्यामुळे असं होत की चुकून जर आपण त्या कामात अपयशी झालो तर आपल्याजवळ त्यामधून सावरण्यासाठी कुठलाच पर्याय नसतात मात्र हाच विचार जर आपण काम सुरु करायच्या आधी केला तर  आपल्याला जास्त त्रास होत नाही.

आपण घेत असलेल्या प्रत्येक विचाराचे भविष्यात काय परिणाम होतील याचा एकदा तरी आपण नक्की विचार करावा.

६. स्वतःवर विश्वास ठेवा:

कुठलंही काम करत असतांना किंवा संकटाशी लढत असतांना सर्वात महत्वाची गोष्ट असते, स्वतःवर विश्वास ठेवणे. तुम्हाला एखाद्या कामात मिळणारं यश किंवा अपयश हे तुमचा स्वतःवर किती विश्वास यावर अवलंबून असते.

कठीण काळात स्वतःवर विश्वास खरंच खूप कठीण असते मात्र अश्या वेळी आपण आपल्यात असणाऱ्या कमतरता पेक्षा आपल्या क्षमतांवर विचार करून स्वतःवरील विश्वास कायम वाढत ठेवावा.

विश्वासासोबत जर आपण सातत्यपूर्ण मेहनत करत असाल तर आपल्याला यश मिळतेच.

लेख वाचुन कसा वाट्ला हे जरुर सांगा….

Leave a comment

x