आनंदी राहण्याचे मुलमंत्र नक्की वाचा I Happy Life Tips in Marathi

आयुष्यात सर्वांची धडपड ही आनंद मिळवण्यासाठीच सुरु असते. मात्र अजून देखील खूप मोठ्या प्रमाणात लोकं आपल्या आयुष्यात आनंदी नाही आहेत त्यांना वाटते की त्यांना जे मिळालेलं आहे त्यापेक्षा जास्त आनंदासाठी, सुखासाठी ते पात्र आहेत आणि हे चुकीचं पण नाही आहे कारण प्रत्येक व्यक्ती हा विशेष असतोच त्याची एक वेगळी ओळख, वेगळा गुण असतोच.

जर आपण हा विचार करत असू की आपलं जीवन हे आपल्यावर एक ओझं झालंय तर लक्षात ठेवा की आपल्याला आपल्या विचारात बदल करावा लागेल. नकारात्मक विचार कधीच वरचढ होऊ देऊ नये.

आजचा लेख हा त्यावरच आहे की जीवन आनंदी कसं बनवावं?, जीवनात आनंद कसा टिकवावा? चला तर आनंदी जीवनाचा मुलमंत्र वाचायला सुरुवात करा.

आनंदी राहण्याचे मुलमंत्र नक्की वाचा I Happy Life Tips in Marathi 

1.) इतरांशी तुलना करत बसू नका :

आपण बऱ्याचवेळा आपली तुलना इतरांशी करतो आणि निराश होतो पण कधी समोरच्या व्यक्तीने त्याची तुलना तुमच्याशी केली आहे का?  हा देखील विचार करा. एखादा यशस्वी, आनंदी व्यक्ती हा कधीच त्याची तुलना इतरांशी करत नाही कारण त्याला माहिती असते की तो काय आहे आणि काय बनू शकते.

जर तुम्ही सतत आपली तुलना इतरांशी करत असाल तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकत नाही. इतरांशी तुलना करणे सोडून द्या आणि स्वतःच्या क्षमतांना ओळखा त्यांना आणखी मजबूत बनवा.

2.) आपला भूतकाळ हा आपला वर्तमान आणि भविष्यकाळ निर्धारीत करू शकत नाही:

बरेच लोकं हे आपल्या चुकापासूनच शिकत असतात मात्र भूतकाळात केलेल्या चुकीचा आपण आपल्या आज आणि उद्यावर परिणाम करून घ्यायचा नसतो.

जर तुम्हीसुद्धा तुमच्या भूतकाळाचा तुमच्या आज आणि उद्यावर परिणाम होऊ देत असाल तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकत. चुकांकडून शिका.

काय करावं : 

जी वाईट गोष्ट/ चूक घडून गेली ते विसरून जाऊन आज जे तुमच्यासमोर आहे त्यासाठी तुमचे सर्वोत्तम प्रामाणिक प्रयत्न करत रहा त्यामुळेच तुमचं भविष्य घडणार आहे. भूतकाळात गुंतून तुमचा आज आणि उद्या बरबाद करू नका.

3.) न सुटणारं सोडून द्या आणि समोर चला :

जीवनात असे बरेच प्रश्न असतात जे कितीही प्रयत्न केला तरी सुटत नाही, त्यामुळे आपला वेळ पण वाया जातो आणि नैराश्य देखील येते. म्हणून अश्या प्रश्नांना सोडवल्यापेक्षा त्यांना सोडून देणेच योग्य असते. निरर्थक त्यामध्ये गुंतून राहील त्यामधून फक्त दुःखच मिळते. जीवन खूप मोठं आहे त्यामुळे समोर चला मार्ग सापडेलच.

परीक्षेत जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल त्यावर विनाकारण वेळ खर्च करणे चुकीचं असते कारण समोर असेही प्रश्न असतात ज्याची उत्तरे आपल्याला येत असतात त्यासाठी वेळ द्या. तेच योग्य असते.

काय करावं : 

आपल्याला सर्वात आधी अश्या कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल जे सोपी आहेत आणि आपण कमी वेळेत करू शकतो.

जेव्हा आपले सोपे काम कमी वेळेत पूर्ण होतात तेव्हा आपल्याजवळ भरपूर वेळ असतो त्याचा उपयोग करून कठीण कामांना सोडावण्याचा प्रयत्न करा आणि नाहीच सुटले तर त्यांना सोडून द्या.

4.) लोकं काय बोलतात, याकडे लक्ष देऊ नका:

बऱ्याच लोकं हे, आपण काय विचार करावा, कोणते कपडे घालावे, काय करावं, कसं वागाव हे इतरांच्या राहणीमानावरून, कपड्यावरून, विचारा वरून ठरवतात. ते पूर्णतः चुकीचं आहे असंही नसतं मात्र समोरच्याला ते लागू म्हणून तो करतो. आपल्याला काय चांगलं वाटेल, दिसेल, आवडेल हे पूर्णतः आपण ठरावाव.

इतरांना काय आवडते, वाटते यामध्ये आपण इतके मग्न झालेले असतो की आपल्याला काय आवडतं याकडे आपलं लक्षच जात नाही. समोरचा तसा वागतो कारण त्यामधून त्याला आनंद मिळतो, तसं केल्यावर आपल्याला पण आनंद मिळेल हे गरजेचं नाही. उलट तसं केल्याने दुःख मात्र हमखास वाढू शकते. त्यामुळे यावर एकवेळ तरी विचार करावा.

काय करावं : 

सर्वात आधी असं तुमच्यासोबत होत आहे का हे शोधा. जर असं होत असेल तर स्वतःला बदला, तुम्हाला जे आवडत ते करा. जर तुम्हांला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर इतरांची नकल करणे योग्य नसून स्वतःच्या क्षमातांना ओळखून त्यावर काम करणे गरजेचं आहे.

5.) प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी असते :

कुणाला चित्र काढणे आवडते, कुणाला बोलणे आवडते, कुणाला लिहायला आवडते, कुणाला खेळणे आवडते. असं प्रत्येकाला आनंद देणाऱ्या गोष्टी ह्या वेगळ्या आहेत. उगाचच इतरांना आनंदी पाहून निराश होऊ नका. तुमचा आनंद कश्यात आहे ते शोधा. जेव्हा  तुम्ही स्वतःला ओळखाल त्यानुसार काम कराल तेव्हा  नक्कीच तुम्हांला खरा आनंद काय असतो हे कळेल.

6.) वेळेजवळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते :

समस्या/ संकटे कितीही मोठी असू द्या, आपण त्यांना हरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत रहा कारण वेळ ही सर्वात शक्तिशाली आहे तिच्या जवळ सर्व समस्यांचे समाधान आहे. तुमी स्वतःच विचार करून बघा भूतकाळात तुमच्यावर आलेलं एखादं संकट तेव्हा तुम्हांला नक्कीच मोठं वाटलं असेल मात्र आता ते पचवून, त्यावर मात करून आपण खूप पुढे आलेलो आहोत.

लक्षात ठेवा, वेळ सर्व गोष्टी बदलते आज जे तुमच्यासाठी वाईट असेल ते उद्या चांगलं होईलच. फक्त आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहावं

7.) गरजेपेक्षा जास्त विचार करू नका :

बऱ्याच लोकांना सवय असते की एखादी गोष्ट घडली की त्यावरच विचार करत बसतात. ती गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे की नाही याचा कुठलाही विचार न करता आणि असं केलं की मग दुःखाचा, त्रासाचा मार्ग आपोआप उघडतो जो आपण स्वतः उघडलेला असतो. म्हणून विचार करायच्या आधी हा विचार नक्की करा की ती गोष्ट खरंच किती महत्वाची आहे.

8.) आपल्या चुकांकडून शिका:

कोणताही यशस्वी व्यक्ती सहसा पहिल्या प्रयत्नात कधीच यशस्वी होत नाही. तो हजार चुका करत असतील मात्र त्या परत परत होणार नाहीत याची काळजी घेतात. त्यामधून शिकतात आणि आपलं यश खेचून आणतात.

यशाचा/ आनंदाचा मार्ग हा चुकामधूनही जातो त्यामधूनच शिकत रहा कारण त्याच आपल्या सर्वोत्तम शिक्षक आहेत. असं व्ह्यायला नको की एखादी चूक झाल्यावर आपण त्यामधून काही शिकलोच नाही.

आपल्याला लेख कसा वाटला ते नक्की सांगा. त्यासोबतच काही सूचना आणि तक्रार असेल तर तेही सांगा.

0 thoughts on “आनंदी राहण्याचे मुलमंत्र नक्की वाचा I Happy Life Tips in Marathi”

Leave a comment

x