वाचा आचार्य चाणक्य यांचे 30 अनमोल विचार मराठीमध्ये II Chanakya Best Quotes in Marathi

marathi quotes of chanakya

Chanakya Marathi Quotes 01 to 10

१. कुठलंही काम सुरु करायच्या आधी स्वतःला खालील 3 प्रश्न विचार
1. मी हे का करत आहे?
2. याचा काय परिणाम होणार आहे.?
3. मी यामध्ये यशस्वी होईल का?
जर विचार करायच्या आधी या प्रश्ननांची उत्तरे मिळाली तर तुम्ही योग्य मार्गावर आहात.
-आचार्य चाणक्य

२. फुलांचा सुगंध फक्त त्याच दिशेला वाहतो ज्या दिशेने हवा वाहत असते मात्र माणसाच्या चांगल्या गुणांचा सुगंध हा चारही दिशांना दरवळतो.

-आचार्य चाणक्य

३. जे स्वतःच्या मेहनतीपेक्षा नशिबावर जास्त अवलंबून असतात.ते स्वतःच त्यांच्या पायावर कुर्हाडी मारत असतात आणि अपयशी आयुष्य जगत असतात.

-आचार्य चाणक्य

४. जे लोकं मेहनती असतात ती कधीच गरीब राहू शकत नाही आणि जी लोकं ईश्वराला मानतात त्यांच्याकडून कधीच पाप/वाईट काम होऊ शकत नाही कारण मेंदूने जागी असलेला मनुष्य हा नेहमी निडर असतो.

-आचार्य चाणक्य

५. आपलं आचरण चांगलं असेल तर आपलं दुःख पण कमी असतं. मेंदूचा वापर करून आपण अज्ञानतेला हरवू शकतो आणि माहिती गोळा करून आपण भीतीलाही संपवू शकतो.

-आचार्य चाणक्य

६. नेहमी नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांची मदद करणे व्यर्थ असते कारण असे लोक नेहमी प्रयत्न न करता परिस्थिती आणि नशिबाला दोष देऊन आपल्या ध्येयापासून कायमचे दूर होतात.

-आचार्य चाणक्य

७. मनात ठरवलेले काम पूर्ण न करताच इतरांना सांगणे म्हणजे स्वतःचा हसा करून घेण्यासारखे आहे. तुम्ही ठरवलेले ध्येय हे पूर्ण केल्यानंतरच इतरांना सांगा तोपर्यंत शांततेत प्रयत्न करत रहा.

-आचार्य चाणक्य

८. संकटाच्या वेळी नेहमी बुद्धीचीच परीक्षा होत असते आणि तीच आपल्या कामाला येते.

-आचार्य चाणक्य

९. अन्नाशिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही आणि भुकेपेक्षा मोठा दुसरा कोणताच शत्रू नाही.

-आचार्य चाणक्य

१०. विद्या, ज्ञान हे निर्धनांच असते आणि असं धन असते ज्याची कधी चोरी केल्या जात नाही आणि जे इतरांना दिल्यावर कमीही होत नाही.

-आचार्य चाणक्य

Marathi Quotes of Chanakya 11 to 20


११. ज्याठिकाणी आपला सन्मान केल्या जात नाही, जिथे तुमचे मित्र नाही, जिथे ज्ञानाच्या गोष्टी केल्या जात नाही त्याठिकाणी आपण एक क्षण सुद्धा थांबू नये.

-आचार्य चाणक्य

१२. मोठा व्यक्ती तोच असतो इतरांना छोटा समजत नाही. -आचार्य चाणक्य

१३. शिक्षण हाच माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे जो त्याला प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळवून देऊ शकतो.

-आचार्य चाणक्य

१४. दुसऱ्या व्यक्तीजवळ असलेल्या धनाचा आपण लोभ ठेवणे हेच आपल्या अधोगतीचे कारण असते.

-आचार्य चाणक्य

१५. व्यक्ती हा त्याच्यात असणाऱ्या गुणांमुळेच मोठा होत असतो. फक्त उंच ठिकाणी बसल्यामुळे कुणी मोठं होत नाही. 

-आचार्य चाणक्य

१६. आपण आनंदात असणं हेच आपल्या शत्रूच्या दुःखाच कारण असतं आणि तीच त्याला शिक्षा पण असते.

-आचार्य चाणक्य

१७. आपल्या अत्यंत व्यक्तिगत गोष्टी कुणालाही सांगू नका कारण वेळ आल्यावर तोच व्यक्ती त्या गोष्टी इतरांना सांगू शकतो.

-आचार्य चाणक्य

१८. एक चांगले वडील म्हणून मुलांना चांगलं काय आणि वाईट काय ही शिकवण मुलांना देणं खूप गरजेचं आहे कारण समजदार, सुज्ञ व्यक्तीचाच समाजात सन्मान केला जातो.

-आचार्य चाणक्य

१९. कर्ज, शत्रू आणि बिमारी यांना कधीच कमी लेखू नका. जमल्यास यांना आपल्या जवळपास पण राहू देऊ नका.

-आचार्य चाणक्य

२०. भविष्यासाठी पैसा गोळा करणे खूप आवश्यक आहे मात्र गरज पडल्यावर तो पैसा खर्च करणे हे त्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे.

-आचार्य चाणक्य

Chanakya Best Quotes in Marathi 21 to 30

२१. आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या शत्रूची कसलीही मदद घेऊ नका नाहीतर जीवनभर त्याच्यासमोर मान झुकवावी लागू शकते.

-आचार्य चाणक्य

२२. ज्याला वेळेच भान नसते, ज्याला वेळेच महत्व समजत नाही तो व्यक्ती आपल्या जीवनात कधीही जागरूक राहू शकत नाही.

-आचार्य चाणक्य

२३. धूर्त आणि कपटी लोकं नेहमी आपल्या व्यक्तिगत स्वार्थ पूर्ण करण्यासाठी इतरांची सेवा करतात, अश्या लोकांपासून नेहमी सावध रहायला हवं.

-आचार्य चाणक्य

२४. जे आळशी लोकं असतात त्यांचा ना वर्तमान चांगला ना भविष्य.

-आचार्य चाणक्य

२५. नशीबसुद्धा त्यांचीच साथ देत जे अत्यंत कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या ध्येयाला मिळवण्यासाठी मनापासून प्रयत्न करत असतात.

-आचार्य चाणक्य

२६. एखादा सुज्ञ व्यक्ती एखाद्या मूर्ख व्यक्तीला खूप वेळा  समजावण्याचा प्रयत्न करत असेल तर तो स्वतःच्या चिंता आणखी वाढवत आहे.

-आचार्य चाणक्य

२७. सापाच्या फणी मध्ये, माशीच्या मुखात, विंचूच्या डंकामध्ये विष भरलेलं असते मात्र वाईट माणसाच्या सर्व शरीरात इतरांसाठी विष भरलेलं असते.

-आचार्य चाणक्य

२८. मित्राता नेहमी आपल्या बरोबरीच्याच व्यक्तीसोबत करावी. अधिक श्रीमंत किंवा गरीब व्यक्तीशी करू नये, नाहीतर कधी कधी त्याची भरपाई करून द्यावी लागते जी खूप दुःखदायक असते.

-आचार्य चाणक्य

२९. आपण बोलत असतांना जो व्यक्ती आपल्याकडे लक्ष न देता इकडे-तिकडे बघतो त्यावर कधीही विश्वास ठेऊ नका.

-आचार्य चाणक्य

३०. आपल्यातील कमतरता कधीही इतरांना उघडपणे सांगू नये तेच आपल्यासाठी हितकारक असते.

-आचार्य चाणक्य
वाचा आणखी महान व्यक्तींची विचार : 

Leave a comment

x