शिक्षक दिवस 5 सप्टेंबरलाच का साजरा करतात… जाणून घ्या I Teachers Day Information in Marathi

Teachers Day Information in Marathi I शिक्षक दिवस 5 सप्टेंबर 2020

शिक्षक दिवसाचे महत्व II Teachers Day in Marathi

भारतात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यादिवशी विद्यार्थी आपापल्या परीने शिक्षकांप्रती आपलं प्रेम, आदर व्यक्त करतात. मात्र यावेळी कोरोना महामारी मुळे शाळा, कॉलेज तर बंदच आहे त्यामुळे विद्यार्थी हा शिक्षक दिवस online साजरा करतील यात शंकाच नाही.

जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचे असते. शिक्षक हे राष्ट्राचे भविष्य आणि युवा वर्ग यांच्या जीवनाचा विकास करण्यासाठी, त्यांना आकार देण्यासाठी खूप खूप महत्वपूर्ण भूमिका साकारत असतात.

प्राचीन काळापासून ऋषी, गुरु यांचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव आहे. यशाजवळ पोहोचण्यासाठी गुरु, शिक्षक यांचं मार्गदर्शन आवश्यक असतेच.

असं म्हटल्या जातं की गुरु अर्थात शिक्षकाशिवाय योग्य मार्गावर चालल्या जाऊ शकत नाही कारण ते आपल्याला ओळखून योग्य मार्गदर्शन करत असतात.  म्हणूनच तर असं म्हणणे चुकीचे ठरणार नाही की जन्मदात्यापेक्षा किंचित जास्त महत्व हे गुरु, शिक्षक यांना दिल्या जाते. कारण ज्ञान हेच माणसाला माणूस बनवते, जगण्याचा योग्य मार्ग दाखवते.

शिक्षक दिन 5 सप्टेंबरलाच का असतो? :

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो तसेच हे म्हणणे पण चुकीचे ठरणार नाही की हा दिवस भारतातील शिक्षकांप्रति सन्मान, सद्भावना आणि शिक्षणाप्रती चैतन्य जागरूक ठेवण्यासाठी देखील साजरा केला जातो.

 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान शिक्षक होते, तसेच ते भारताचे पाहिले उपराष्ट्रपती तर दुसरे राष्ट्रपती होते.  त्यांचं असं म्हणणं होतं की जे बुद्धिमान लोकं आहेत त्यांनीच शिक्षक बनायला हवं.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं नाव 27 वेळा नोबेल पुरस्काराच्या नामांकन यादीत गेलं होतं. 1954 साली त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवन परिचय :

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडू मधील तिरुतनी या गावातील एका गरीब कुटुंबात झाला. घराची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असूनही लिहिण्या-वाचण्यात मात्र ते बुद्धीने श्रीमंत होते. त्यांचे शालेय शिक्षण तिरुवल्लूर येथे झालं.  1916 मध्ये त्यांनी MA पदवी मिळवली आणि  मद्रास रेसिडेन्सी कॉलेज मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरीला सुरुवात केली.

राजकारणात यायच्या आधी त्यांनी 40 वर्ष शिक्षण सेवेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते म्हणायचे की माणूस शिक्षकांशिवाय कुठलच यश मिळवू शकत नाही, म्हणून माणसाच्या आयुष्यात शिक्षक हा हवाच.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राधाकृष्णन यांना सोवियत संघ येथे राजकीय कार्य सांभाळण्यासाठी त्यांची राजदूत म्हणून नियुक्ती झाली, नंतर त्यांनी उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती यांचा देखील पदभार सांभाळला.   

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल काही रोचक माहिती : (Teachers Day Special in Marathi)

1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे इंग्रजी शिकत आणि इंग्रजी शाळेतच शिकायला जायचे मात्र हे त्यांच्या वडिलांना आवडत नसे, त्यांना वाटायचं की राधाकृष्णन यांनी पूजारी व्ह्याव.

2. डॉ. राधाकृष्णन हे खूप हुशार विद्यार्थी होते त्यांनी आपलं जास्तीत जास्त शिक्षण हे शिष्यवृत्ती घेऊनच पूर्ण केलं आहे.

3. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये एवढे लोकप्रिय होते की एकदा ते कोलकाता जात होते तर त्यांना म्हैसूर विश्वविद्यालयापासून ते रेल्वे स्टेशन पर्यंत फुलांनी सजवलेल्या गाडीतून त्यांच्या विद्यार्थ्यांनी नेले.

4. त्यावेळचे प्रसिद्ध प्रोफेसर एच.एन. स्पेलडिंग डॉ. राधाकृष्णन यांचे लेक्चर ऐकून एवढे प्रभावित झाले की त्यांनी लंडन विश्वविद्यालयात यांच्यासाठी स्पेशल चेअर स्थापण केली.

5. जगात 100 पेक्षा जास्त देशात शिक्षक दिवस वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो. जागतिक शिक्षक दिवस हा 5 ऑक्टोबर ला असतो.

6. यूनेस्को ने 1994 मध्ये शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी जागतिक शिक्षक दिवस हा 5 ऑक्टोबर ला साजरा करण्याची मान्यता दिली.

Leave a comment

x