समाजसेवी बाबा आमटे यांची माहिती : Baba Amte Information in Marathi

Baba amte information in marathi
Dr Baba Amte Information in Marathi

महामानव, समाजसेवी बाबा आमटे यांच्याविषयी माहिती  (Baba Amte Information in Marathi)

बाबा आमटे उर्फ मुरलीधर देवीदास आमटे हे एक मराठी समाजसेवक म्हणून ओळखले जातात. कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी चंद्रपूर महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला होता. त्यांनी कुष्ठरोग्यांची तसेच समाजातील इतर दुर्बल लोकांची खूप सेवा केली आहे. याशिवाय त्यांनी नर्मदा बचाव आंदोलन, वन्य जीवन संरक्षण अश्या इतर सामाजिक चळवळींमध्येही सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांना भारताचे आधुनिक संत या नावाने सुद्धा गौरविले जाते. 

बाबा आमटे यांचा जीवन परिचय : (Baba Amte Biography in Marathi)

बाबा आमटे यांचे पूर्ण नाव मुरलीधर देविदास आमटे होते. 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आमटे घराण्याकडे जमिनदारी असल्यामुळे त्यांचे बालपण खूप सुखात आनंदात गेले. वृत्तपत्रांमधून चित्रपटांचे परीक्षण लिहिणे तसेच रे सरकार चालवणे त्यांना खूप आवडायचे. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून 1934 झाली BA आणि 1936 साली LLB  ह्या पदव्या प्राप्त केल्या. आपण डॉक्टर बनवावे ही त्यांची इच्छा होती, मात्र वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. काही काळ त्यांनी वकिलीही केली. 1949-50 या कालावधीत त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या शिफारशीमुळे फक्त डॉक्टरांना करता येणारा कुष्टरोगनिदाना वरील आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला. 

 गांधीजींच्या सेवाग्राम या आश्रमात राहत असतांना त्यांनी गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय भाग घेतला. 1934 झाली वंदे मातरम ची घोषणा दिल्या बद्दल त्यांना 21 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्या व्यतिरिक्त त्यांनी राष्ट्राच्या महत्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली आणि आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. राष्ट्राच्या एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी 1985 साली ‘भारत जोडो’ हे अभियान राबविण्यास सुरुवात केली, यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवले. नर्मदा बचाव आंदोलनात त्यांनी तब्बल बारा वर्ष नर्मदा नदीच्या काठी मुक्काम करून आंदोलनाला भरभक्कम पाठिंबा दिला. 

आनंदवन : (Baba Amte Anandvan Information in Marathi)

त्यावेळी लोक असा विचार करायचे की ज्यांना कुष्ठरोग झालाय हे त्यांच्या मागील जन्मीच्या पापांचे फळ आहे. म्हणून कुष्ठरोग्यांना त्यावेळेस वाळीत टाकले जाई. एकदा बाबा आमटे यांना पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी दिसला. बाबांनी त्या कुष्ठरोग्याकडे बघून हा विचार केला की जर या ठिकाणी मी असतो तर…

त्यांनी त्याच व्यस्त पोस्ट रूबेला उचलून आपल्या घरी आणले. त्यानंतर बाबांनी कुष्ठरोग म्हणजे काय याविषयी ची माहिती गोळा करून त्याविषयीच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि 1952 साली त्यांनी वरोड्याजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. आनंदवनमध्ये कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर,  आदिवासी अश्या विविध वंचित आणि दुर्लक्षित माणसांना हक्काचं घर मिळालं.

कुष्ठरोगाचे आयुष्य हे मरणापेक्षाही भयानक असे. अश्या महाभयंकर रोगाने ग्रासलेल्या लोकांची सेवा करण्याचे अतीकठीण व्रत त्यांनी स्वीकारले. कुष्ठरोग्याची सेवा करून त्याला बरं करणे नाही त्याला आत्मनिर्भर बनवण्याची शपथच जणू बाबांनी घेतली. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची सुद्धा स्थापना केली. त्यांना सुशिक्षित करण्यासाठी त्यांनी महाविद्यालयाची देखील स्थापना केली. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला. घनदाट जंगल,  दळणवळणासाठी नसणारी साधने, प्रचंड पडणारा पाऊस, पावसात मार्ग अडवून वाहणारे नदी-नाले, अन्न वस्त्र निवारा यांची कमतरता, आदिवासींचे अज्ञान, अंधश्रद्धा अश्या अनेक प्रतिकूल परिस्थितीचा बाबांनी जिद्दीने सामना करून कामे पूर्णत्वास नेली.

सहा कुष्ठरोगी, 14 रुपये, 1 आजारी गाय आणि सरकारकडून मिळालेली 50 एकर नापीक जमीन घेऊन, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी 23 डिसेंबर 1973 रोजी लोक बिरादरी प्रकल्प सुरु केला. बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे व त्यांची पत्नी मंदाकिनी आपटे हे हा प्रकल्प समर्थपणे सांभाळत आहेत. येथे आदिवासींना शेतीच्या माहिती नसलेल्या नवनवीन पद्धती शिकवल्या जातात तसेच विध्यार्थ्यांसाठी शाळा आणि जेष्ठ नागरिकांसाठी ‘उत्तरायण’ ही निवासी संस्था चालवली जाते.

पत्नी श्रीमती साधना आपटे यांच्या बाबांच्या या कार्यात त्यात तोडीचा वाटा आहे. साधनाताई यांनी त्यांच्या ‘समिधा’ या आत्मचरित्रातून बाबांच्या जीवनकार्याचा प्रत्यक्ष आढावा आपल्याला वाचायला मिळतो.

प्रखर बुद्दीमत्ता, संवेदनशीलता, धाडस, प्रचंड प्रमाणात शारीरिक व मानसिक मेहनत करायची तयारी, ठरवले ते साध्य करण्याची वृत्ती अश्या अनेक गुणांच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प यशस्वी केले.

मृत्यू : 

9 फेब्रुवारी 2008 रोजी वरोडा येथील निवास्थानी रक्ताच्या कर्करोगाने बाबांचे निधन झाले. बाबांच्या पुढच्या पिढ्याही (डॉ. प्रकाश आमटे, विकास आमटे आणि त्यांचे कुटुंबीय) हे विविध प्रकल्पाच्या माध्यमातून तेवढ्याच निष्ठेने व सातत्याने काम करत आहेत.

साहित्य :

बाबा आमटे यांनी खालील पुस्तके लिहिली आहेत

‘ज्वाला आणि फुले’ – कवितासंग्रह

‘उज्ज्वल उद्यासाठी’ (काव्य)

‘माती जागवील त्याला मत’

बाबा आमटे यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके

आनंदवन प्रयोगवन लेखक डॉ. विकास आमटे [५]

मला (न) कळलेले बाबा आमटे (लेखक : विलास मनोहर)

बाबा आमटे (चरित्र, मूळ लेखिका तारा धर्माधिकारी; हिंदी अनुवाद डॉ. हेमा जावडेकर)

बाबा आमटे (चरित्र, लेखक भ.ग. बापट)

बाबा आमटे यांची गीते : आकलन आणि आस्वाद (बाळू दुगडूमवार). या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे (२०१७)

बाबा आमटे यांच्या जीवनावर वसंत कानेटकरांनी ‘वादळ माणसाळतंय’ नावाचे नाटक लिहिले आहे.

बाबा आमटे – व्यक्तित्व, कवित्व आणि कर्तृत्व (लेखक : बाळू दुगडूमवार)

पुरस्कार : 

आंतरराष्ट्रीय

सामाजिक सुधारणांसाठीचा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार इ.स. १९९९

रॅमन मॅगसेसे पुरस्कार

डेमियन डट्टन पुरस्कार, अमेरिका – इ.स. १९८३ .कुष्ठरोग्यांप्रीत्यर्थ कार्यासाठी दिला जाणारा अत्युच्च आंतरराष्ट्रीय पुरस्.

संयुक्त राष्ट्रे यांचा मानवी हक्क पुरस्कार, इ.स. १९९८

आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, अमेरिका इ.स. १९८९

टेंपल्टन बहुमान, अमेरिका (मानवतावादी कार्यासाठी), इ.स. १९९०

पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रे यांचा रोल ऑफ ऑनर, इ.स. १९९१

पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार, इ.स. १९९१

पावलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार (४ डिसेंबर २००४)

राईट लाइव्हलीहुड ॲवॉर्ड, स्वीडन – इ.स. १९९१. (पर्यायी नोबल पुरस्कार) ( नर्मदा बचाव आंदोलनासाठी मेधा पाटकर यांच्या सोबत संयुक्तपणे )

गूगल ने २६ डिसेंबर २०१८ रोजी बाबा आमटे (त्यांच्या जयंतीच्या दिवशी) यांच्यावरचे डूडल दाखवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.[६]

भारतीय

पद्मश्री इ.स. १९७१

पद्मविभूषण इ.स. १९८६

अपंग कल्याण पुरस्कार इ.स. १९८६

महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार इ.स. १९९८

गांधी शांतता पुरस्कार इ.स. १९९९

महाराष्ट्र भूषण पुरस्कार २००४ (महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च सन्मान) १ मे, इ.स. २००५ रोजी त्यांना आनंदवन येथे देण्यात आला.

मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार इ.स. १९८५

पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार इ.स. १९८६

महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार इ.स. १९७४

राष्ट्रीय भूषण पुरस्कार इ.स. १९७८

जमनालाल बजाज पुरस्कार इ.स. १९७९

एन डी दिवाण पुरस्कार इ.स. १९८०

राजा राम मोहनराय पुरस्कार इ.स. १९८७

भरतवास पुरस्कार इ.स. २००८

जी डी बिर्ला अंतरराष्ट्रीय पुरस्कार इ.स. १९८८

महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार इ.स. १९९१

कुमार गंधर्व पुरस्कार इ.स. १९९८

जस्टिस के एस हेगडे पुरस्कार, कर्नाटक इ.स. १९९८

डी.लिट – नागपूर विद्यापीठ इ.स. १९८०

डी. लिट. – पुणे विद्यापीठ, इ.स. १९८५-८६

देशिकोत्तम (सन्मानीय डॉक्टरेट) इ.स. १९८८ -विश्वभारती, शांतिनिकेतन , पश्चिम बंगाल

Leave a comment

x