Mahatma Gandhi Quotes in Marathi

आज आपण महात्मा गांधीजी यांचे विचार (Mahatma Gandhi Quotes in marathi) तसेच त्यांचा जीवन परिचय (Mahatama Gandhi Informatioan, Biography in marathi) याबद्दल माहिती पाहणार आहोत.

महात्मा गांधीजी यांना न ओळखणारा एकही माणूस या भारतात असेल असं मला वाटत नाही. भारताला इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा खुप महत्वाचा वाटा आहे.

Mahatma Gandhi Information in Marathi

नाव : मोहनदास करमचंद गांधी
जन्म : 2 ऑक्टोबर 1869
जन्मठिकाण : पोरबंदर (गुजरात)
आई : पुतळाबाई करमचंद गांधी
वडील : करमचंद उत्तमचंद गांधी
सत्याग्रह : चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, असहकार चळवळ, दांडी यात्रा, हरिजन आंदोलन, भारत छोडो आंदोलन.मृत्यू : 30 जानेवारी 1948
मृत्यू ठिकाण : नवी दिल्ली

Quote on mahatma gandhi in marathi

Mahatma Gandhi Quotes in Marathi

जो बदल तुम्हाला जगात बघायचा आहे तो बदल आधी स्वतःमध्ये करा.

माणुसकीवर विश्वास ठेवा. माणुसकी ही सागरासारखी असते, जर त्यामधील एखादा थेंब गढूळ असला तर त्याने सागराला काहीच फरक पडत नाही.

स्वतःला शोधायचं असेल तर इतरांची सेवा करा.

आधी लोकं तुमच्याकडे दुर्लक्ष करतील नंतर ते तुमच्यावर हसतील मग ते तुमच्याशी भांडतील आणि शेवटी तुम्ही जिंकलेले असाल.

ज्यादिवशी भारतातील स्त्रिया रात्री स्वातंत्र्यपणे फिरू शकतील त्यावेळी भारत स्वातंत्र्य झालेला असेल.

माणूस हा त्याच्या विचारापासून निर्माण झाला आहे, तो जसा विचार करतो तसाच बनतो.

साध्या विनम्रपणे तुम्ही पूर्ण विश्व हलवू शकता.

Mahatma Gandhi jayanti quotes in Marathi

कोणत्याही व्यक्तीला त्याच्या वाईट विचारासोबत मी माझ्या मनात ठेऊ शकत नाही.

जर डोळ्याच्या बदल्यात डोळा मागितला तर सर्व जग आंधळं होईल.

शक्ती ही शारीरिक क्षमतेपासून येत नाही तर त्यासाठी मनात दुर्दम्य ईच्छा हवी.

थोडासा अभ्यास खूप साऱ्या सल्ल्यापेक्षा चांगला असतो.

विश्वासाला नेहमी तर्क लावून तपासुन घ्या. जेव्हा विश्वास आंधळा होतो तेव्हा तो मरून जातो.

तुमचं भविष्य यावर अवलंबून असतं की आता तुम्ही काय करत आहात.

खरा आनंद तेव्हा मिळतो जेव्हा आपलं विचार करणं, आपलं बोलणं आणि आपलं करणं यामध्ये समानता असते.

शांत राहणं हे सर्वात सशक्त भाषण आहे, जग तुम्हाला हळू हळू ऐकते.

Mahatma Gandhi Slogan in Marathi

एक चांगला माणूस हा सर्व सजीवांचा मित्र असतो.

वाईट व्यक्तिमधील वाईट सोडा आणि त्याच्यावर प्रेम करा.

कमजोर लोकं क्षमा करत नाही आणि क्षमा ही  ताकदवर लोकं करतात.

कोणत्याही देशाची संस्कृती ही त्या देशातील माणसाच्या मनात असते.

जगावं असं की तुम्ही उद्या मरणार आहे आणि शिकावं असं की तुम्ही कधीच मरणार नाही.

तुम्ही करणाऱ्या कामाचा परिणाम तुम्हाला माहीत नसेल मात्र तुम्ही काही करणारच नाही तर त्याचा काहीच परिणाम होणार नाही.

आरोग्य हेच खरं धन आहे त्याच्यासमोर सोनं, चांदी याची काहीच किंमत नाही.

Quotes on Mahatma Gandhi in Marathi

चालतांना ठोकर लागून आपण पडू मात्र काहीच न करता उभं राहण्यापेक्षा ते चांगलंच आहे.

आपल्या ज्ञानावर, शिक्षणावर अतिविश्वास ठेऊ नका कारण ताकदवर कमजोर होऊ शकतो आणि बुद्धिमान व्यक्तीकडुनही चूक होऊ शकते.

अहिंसा ही सर्वात मोठी ताकद आहे. जगाला संपवणाऱ्या हत्यारापेक्षाही अहिंसा ताकदवान आहे.

जगात आपल्या गरजा नक्कीच पूर्ण होऊ शकतात, ईच्छा पूर्ण होतीलच असे नाही.

आपण जे मानलं आहे त्याचे विचार बनतात, विचाराचे शब्द बनतात, शब्दाचे काम बनते, काम आपल्याला सवयी लावतात, सवयी आपलं मूल्य वाढवतात आणि मूल्य आपली नियत बनते.

मी लोकांच्या चांगल्या गोष्टीकडे लक्ष देतो, त्यांच्या चुका दुर्लक्षित करतो.

Mahatma Gandhi Thoughts in Marathi

वाईट लोकं हे काही काळासाठी अजेय असतात मात्र त्यांचं पतन हे होतेच.

तुमचे विचार, शब्द आणि कृती यामध्ये नेहमी एकवाक्यता ठेवा.

माझ्या परवानगी शिवाय मला कुणीही दुखवू शकत नाही

मित्राशी मैत्री करणे सोपे आहे मात्र तुम्ही ज्याला शत्रू समजता त्याच्याशी मैत्री करणे फार कठीण आहे.

सत्य कधीच वाईट गोष्टींना साथ देत नाही.

मी त्याला धार्मिक समजतो तो इतरांच्या वेदना समजून घेतो.

रोज रात्री जेव्हा मी झोपायला जातो तेव्हा मी मरतो आणि दुसऱ्या दिवशी उठल्यावर माझा पुनर्जन्म होतो.

36. काहीही करतांना ते मनापासुन करा किंवा करूच नका.

माझ्या जर हसता आलं नसतं तर मी खूप आधीच आत्महत्या केली असती.

आपण आपल्यांना गमावतो तेव्हा आपल्याला कळते की आपल्यासाठी कोण जास्त महत्वाचे आहे.

माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारीत आहे. सत्य म्हणजे देव तर अहिंसा म्हणजे तो देव मिळवणे.

माणुसकीचे मोठेपण मानव असण्यात नसून माणुसकीत आहे.

Leave a comment

x