Marathi Charoli on Aai I आईवर काही खास चारोळ्या

आईबद्दलच प्रेम शब्ब्दात व्यक्त करणे खरोखरच खूप कठीण असते. आपल्या मुलांवर निःस्वार्थ प्रेम करणारी जगात  बहुदा ती एकमेव व्यक्ती असेल. या कविता/चारोळ्यामधून थोडाफार प्रयत्न केला आहे तिच्यापर्यंत प्रेमाजवळ पोहचण्याचा. मुलीशी आईशी असणारं नातं, मुलाचं आईशी असणारं नातं, कुणी नुकत्याच आई बनल्या असतील किंवा कुणालातरी त्यांची आई सोडून गेली असेल. आईचं महत्व सर्वांनाच माहिती आहे. 

प्रत्येकाला आईविषयी नितांत प्रेम असतं मात्र प्रत्येकजण ते शब्दात व्यक्त करू शकत नाही पण त्यांना ते शब्दात वाचण्याची खूप ईच्छा असते म्हणून बरेचशे लोकं internet वर Marathi poem on aai, Marathi kavita aai, Aai var kavita, Aai var marathi kavita, Marathi poem on mother, Marathi aai status, आई बद्दल कविता, आई मराठी कविता, आई वर चारोळी असं करतात.

आईविषयी असणारे प्रेम व्यक्त करणाऱ्या कविता, चारोळ्या जर आपण  शोधत असाल किंवा स्वतःच त्या वाचून त्याचा आनंद घ्यायचा असेल तर अश्या प्रकारच्या कविता/चारोळ्या इथं वाचायला मिळतील. आईबद्दल चे मार्गदर्शन, सामर्थ्य आणि प्रेम साजरे करण्यासाठी वाचा काही खास कविता.

Marathi Poem on Aai : आई साठी काही खास कविता

अनेक चेहरे
बदलतांना पाहिले,
आईला मात्र प्रत्येकवेळी
प्रेम करताना पाहिले.

आई वर कविता

कठीण दिसणाऱ्या वाटाही
सहज पार होतात
आईचे आशीर्वाद
जेव्हा आपल्या सोबत असतात.

aai poem

डोळ्यात बघून
जे मनातलं ओळखते
ती फक्त आणि फक्त
आईच असते.

kavita on aai

कुणी उपवास धरला
कुणी रोजा ठेवला
ज्यांनी आईवडीलांना पूजलं
देव त्यांनाच पावला.

aai var kavita

आपल्या बाळाला हसवण्यासाठी
जी स्वतः रडायला तयार असते
ती फक्त आई असते.

aai var marathi kavita

या जगात
निःस्वार्थ प्रेम करणारी
एकच व्यक्ती असते
ती आई असते.

aai var marathi kavita

आईच महत्त्व
त्यालाच कळतं,
लहानपाणीच जे मुल
आईच्या प्रेमाला मुकतं.

aai varun kavita

आयुष्यात त्यांना
काहीच कमी पडत नाही,
जे आईच्या डोळ्यात
कधी पाणी येऊ देत नाही.

marathi kavita aai baba

खरं प्रेम कसं करावं
ते आईकडून शिकावं
मुलांना काहीच न मागतां
त्यांना फक्त देत राहावं.

marathi charolya aai

आईसोबतच नातं
काहीसं असं असावं
दुःखी ती असेल तर
आनंदी आपणही नसावं.

aai vadil kavita

मनातलं ओळखणारी
डोळ्यातलं वाचणारी
सुख असो वा दुःख
सर्वकाळ प्रेम करणारी
आई असते.

marathi poem on mother

जी माझा प्राण आहे
 तीच माझा स्वाभिमान आहे
जिच्या पायाशी माझं मस्तक झुकत
ती फक्त माझी आई आहे.

small poems on mother in marathi

जीवनातील पहिली शिक्षक
आणि मैत्रीण आई असते
आपलं जीवन पण आईच कारण
आपल्याला जीवन देणारी आईच असते.

mom poem in marathi

आईची ममता विसरणं
म्हणजे शरीरातून प्राण सोडणं.

short poem on mother in marathi

स्वतः जागी राहून
आम्हाला झोपवलं,
आम्हाला हसवण्यासाठी
स्वतःला रडवलं,
हे देवा दुःख कधीच नको देऊ तीला
जीला मी आई म्हटलं.

mothers day poem in marathi

Short Poem on Aai in Marathi


आई खूप प्रेमळ असते
मन तीचं फार निर्मळ असते
आनंद सारा देऊन आपल्याला
दुःख आपलं घेऊन जाते.

poem on mother in marathi lyrics

आई  जितकी प्रेमळ असते
आणि तितकीच कणखर दिसते
भर उन्हात ती आपल्याला
गारवा देणारी सावली असते.

poem on mom in marathi

तुझ्या कुशीत
लपलय माझं बालपण,
तुझ्या सोबत जुडलाय
माझा प्रत्येक क्षण.

marathi kavita on mother

तुझ्याविना घर हे
आता सुनं पडलंय,
तू गेल्यावर मन माझं
आता परकं झालंय.

mother marathi poem

इतरांना सांगूनही
समजत नसते,
एक आईच असते
जिला न सांगताच सगळं कळते.

heart touching poem on mother in marathi

आई असेल सोबतीला
तर विष सुद्धा अमृत होईल,
आई नसेल सोबतीला तर
सावलीतसुद्धा चटके देईल.

माझी आई कविता

Marathi Charoli on Aai : आईवर काही खास चारोळ्या

यश मिळालं की
तिच्या मिठीत घेते आई
अपयश मिळाली तरी
तिच्या मिठीत घेते आई.

आई साठी कविता

सर्व गुन्हे माफ करणारं
एकच नायालय
ते आहे फक्त
आईचं हृदय.

आई कविता संग्रह मराठी

Short Poems on Mother in Marathi

 

जोरात ओरडल्यावर
जी क्षणात कवेत घेते
ती फक्त आणि फक्त
आपली आई असते.

आई कविता मराठी

जग अंधार तेव्हा
आई प्रकाश असते,
जग तिखट तेव्हा
आई शहद असते.

आई या विषयावर मराठी कविता

आईच्या प्रेमाची
तुलनाच अशक्य
मुलांच्या आनंदासाठी
तीला सर्वकाही शक्य.

आई कविता मराठी डाउनलोड

आई असली की
खारट  पण गोड लागते,
आई नसली की
मिरचीहून तिखट जिंदगी वाटते.

आई बद्दल कविता

बऱ्याच नात्यात
नफा-तोटा असतो,
आईच्या नात्यात मात्र
निःस्वार्थ भाव दिसतो.

marathi poem on aai

आईवडील सोडून
दुसरं दैवत नाही,
चुकवू शकू त्यांच ऋण
एवढी माझी ऐपत नाही.

marathi kavita aai

Marathi Charoli on Aai

आईच्या प्रेमात
काय जादू दिसत होती,
तिने फिरवलेल्या हाताने
जखम बसत होती.

kavita on aai

मुला-मुलीतील प्रेम
स्वार्थावर अवलंबून असतं,
आईचं मुलांवरील प्रेम
निःस्वार्थ भावावर टिकतं.

aai var kavita

आईचं प्रेम मनात
वडिलांची ताकद मनगटात,
मग कितीही येवोत संकटे
जरी माझ्या आयुष्यात.

mazi aai marathi kavita

तसे आयुष्यात
अनेक लोकं भेटतात,
पण सगळ्या चुका माफ करणारे
फक्त आईवडीलच असतात.

aai var marathi kavita

ईश्वराची भक्ती केल्याने
आपल्याला आई नाही मिळणार
पण आईची सेवा केली तर
ईश्वर नक्की भेटणार.

aai varun kavita

एक आईच आहे
जी कधी मुलाचं वाईट पाहत नाही,
मुलाने कितीही चुका केल्या
तरी त्याच्यावर नाराज होत नाही.

marathi kavita aai baba

आपल्यामुळे आई
आनंदी नसेल,
तर ईश्वर आपल्याला कसा
आनंदी ठेवेल.

aai poem

Aai Quotes in Marathi

स्वर्गामधील सुख
तेव्हा अनुभवलं,
आईने जेव्हा तिच्या
मिठीत घेतलं.

marathi charolya aai

थांबली तर चंद्रासारखी,
चालली तर वाऱ्या सारखी,
ती आईचं असते जी
उन्हात सुद्धा सावली सारखी.

marathi poem on mother

तुझ्यापेक्षा ना मोठं कोण
तुझ्यापेक्षा ना प्रेमळ कुणी,
आई तूच आमची देवता,
तुझ्यासारखं मला ना सांभाळलं कुणी.

marathi kavita aai

ती असली आयुष्यात की
कुठलंच दुःख नसते,
दुनिया सोबत असो किंवा नसो
आईचं प्रेम सदैव सोबत असते.

small poems on mother in marathi

प्रेमाची जननी आई
तिला अनेक सलाम,
मुलांना सदैव आनंदी ठेवते
जीवनभर करून काम.

mom poem in marathi

जगातील प्रेम
नश्वर आहे,
फक्त आईच्या प्रेमातच
ईश्वर आहे.

marathi poem on aai

आईला नाराज करणे
ही माणसाने केलेली चूक असते
माझा मुलगा सदैव आनंदी राहावा
एवढीच आईची भूक असते.

short poem on mother in marathi

असं कधीच म्हणू नका की
आई राहते तुमच्याकडे,
तर गर्वाने सांगा की
मी राहतो आईकडे.

marathi poem on aai

जगताना आता
बऱ्याच अडचणी येतात,
कारण बऱ्याच आई
आता वृद्धाश्रमात दिसतात.

small poems on mother in marathi

आईने डोक्यावरून हाथ फिरवला
की जगण्यास हिम्मत मिळते,
आईच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं
की माझ्या कष्टाला किंमत मिळते.

mom poem in marathi

वळणाचा प्रवास ही
सरळसोपा वाटतोय,
हा बहुतेक माझ्या
आईच्या आशीर्वाद दिसतोय.

short poem on mother in marathi

माझ्या नशिबात
कधीच दुःख नसतं,
जर नशीब लिहायचं काम
माझ्या आईच्या हाती असतं.

poem on mom in marathi

मी असण्याचं कारण आई आहे,
माझ्या जीवनातील आनंद आई आहे,
सगळ्यांचा ईश्वर वेगवेगळा असेल
पण माझा ईश्वर माझी आई आहे.

आई साठी कविता

घरात स्वयंपाक
कमी असते
तेव्हा एकाच व्यक्तीला
भूक नसते, ती आई असते.

mazi aai marathi kavita

0 thoughts on “Marathi Charoli on Aai I आईवर काही खास चारोळ्या”

Leave a comment

x