प्रेमावर काही प्रेमळ चारोळ्या I Marathi Charolya on Love in 2020

जीवन ज्याच्याविना जगणे शक्यच नाही अशी गोष्ट म्हणजे प्रेम. एक प्रेमच असते जे मनाने खचलेल्या माणसाला प्रेरणा, दुःखी माणसाला आनंद देते. प्रेम मग ते कुठलही असो आईचे प्रेम, वडिलांचे प्रेम, भावा-बहिणीचे प्रेम, पती-पत्नीचे प्रेम जीवनातील प्रत्येक टप्प्यावर प्रेमाची गरज असतेच. प्रेमामुळेच माणूस आनंदी, उत्साही, समाधानी राहतो म्हणून बरेच लोकं google वर प्रेमाविषयी अनेक गोष्टी सर्च करतात जसे… Marathi poem on love, Marathi prem kavita, love kavita marathi, romantic poem in marathi, marathi charolya on love, मराठी प्रेम कविता, मराठी प्रेम कविता चारोळ्या.

जर तुम्हांला सुद्धा प्रेम या विषयावरील कविता, चारोळ्या वाचायाच्या असतील तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. चला तर मग वाचायला सुरुवात करा…

वाचा : प्रेमावर काही प्रेमळ चारोळ्या (Best Marathi Charolya on Love in 2020)

गुलाबाला माहीत झालं
चंद्राला पण कळालं
माझं हे मन फक्त
तुझ्यासाठी धडकतं.

marathi love poem

आसमंतात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कुणी नाही
लाखो चेहरे दिसती धर्तीवर
पण तुझ्यासारखा कुणी नाही.

marathi prem kavita

धरून तुझा हाथ
तुला दूर घेऊन जाईल
जिथं तूझ्या-माझ्याशिवाय
फक्त प्रेम दिसून येईल.

marathi kavita on love

तुला सोडून मनात
दुसरं कुणीच नाही
ओठावरही नाव आता
तुझ्याशिवाय कुठलंच नाही.

premachi kavita

मनात धडकणारा
तू एक हिस्सा आहे
तुझ्यासाठीच जगण्याचा
हा सर्व किस्सा आहे.

first love poem in marathi

पहिल्या नजरेत तिने
केला मनावर वार
मग तीच झाली माझ्या
जीवनाचा संपूर्ण सार.

love poems in marathi romantic

बोलतांना तिच्याशी
शब्दच सुचत नाही
पण तिला पाहिल्याशिवाय
मन माझंपण लागत नाही.

love kavita marathi


Also Read:झोपही आता
दिवसरात्र येत नाही
तुझा विचार मनातून
एक क्षणही जात नाही.

love poem in marathi for girlfriend

आयुष्यातील प्रत्येक क्षणी
सोबत तुझी असावी
तुला विसरून आता
मला जिंदगीही नसावी.

marathi kavita friendship love

एकवेळ झालेलं प्रेम
विसरल्या जात नाही
तुझ्याशिवाय मन आता
कुठेही रमत नाही.

romantic marathi kavita

माझी तुझ्याशी आता
नाही कुठलीच तक्रार
तू सोबत असो वा नसो
प्रेम तुझ्यावरच करणार.

marathi charolya on love

माझं मन आणि जीवन
तुझ्यावर ओवाळतो
मला हवा असलेला जीवनसाथी
फक्त तुझ्यातच दिसतो.

marathi kavita for wife

तू कविता असशील तर
मला शब्द बनायच आहे
तुला मिळवायचं नाही
तर मला तुझंच व्ह्यायच आहे.

prem kavita marathi text

तुला सोडून आता
काहीच आठवत नाही
तुला आठवल्याशिवाय
आता एकही क्षण जात नाही.

romantic poem in marathi

नाही आणू शकत तुझ्यासाठी
मी चंद्र आणि तारे
पण कधीच नाही येऊ देणार
तुझ्या आयुष्यात दुःखाचे पसारे.

marathi poem for love

मनाच्या प्रत्येक कप्प्यात
आता तूच भरली आहे
माझ्या प्रत्येक श्वासात
तुझीच प्रतिमा कोरली आहे.

prem poem in marathi

तू रुसली तर
काळजी वाटते
तू हसली की
काळजी मिटते.

prem poem in marathi

नजरानजर झाल्यावर
तुझं लाजणं मनाला भावतं
मग तुला फक्त नजरच नाही
तर मनसुद्धा बघायला लागतं.

marathi charolya prem

सोडून जाताना मला म्हणाली
परत प्रेम करशील का माझ्यावर
मी म्हणालो ‘सोडून तू गेली’ मला
मी तर अजूनही प्रेम करतोय तुझ्यावर.

marathi poem

समुद्रात भटकलेल्या नावेला
किनाऱ्याची ओढ असते
माझ्या अंधारलेल्या आयुष्यातही
सदैव तुझ्या प्रेमाची ओढ असते.

heart touching marathi kavita

तू असली सोबत
तर दुःख पण सुख असते
तुझ्याविना मला तर
सुख पण दुःख वाटते.

marathi premachi kavita

तुला विसरायचं म्हंटल
की सर्वच आठवते
तुझ्याबद्दलच प्रेम
मग आणखी घट्ट होते.

marathi kavita for gf

तू सोबत असली की
रडण्यालाही अर्थ आहे
तू सोबत नसली की
मग हसणं सुद्धा व्यर्थ आहे.

marathi love poems for her

मी सागर तर तू
किनारा आहेस
माझ्या अंधारलेल्या आयुष्यात
तूच प्रकाशाचा निखारा आहेस.

poem for bf in marathi

दिवसभरात मी
कितीशे चेहरे पाहतो
मात्र स्वप्नात फक्त
तुझाच चेहरा दिसतो.

marathi kavita on love life

तुझ्या चुकीसाठी
तुला शिक्षा कुठलीच नाही
कारण तुला त्रास व्ह्यावा
हे माझ्या मनाला पटतच नाही.

marathi kavita

माझ्या आनंदामागील कारण
तू अशीच बनून रहा
जीवनात नाही आली तरी चालेल
फक्त माझं जीवन होऊन रहा.

सच्चा प्रेम कविता मराठी

तुझ्यासाठी नसेल मी
तुला हवा तसा
पण माझ्यासाठी तू
जगण्यासाठी श्वास जसा.

रोमांटिक प्रेम कविता मराठी

कदाचित माझ्यापेक्षा चांगला
तुला कुणी भेटू शकेल
पण माझ्यासारखं, तुलाच जीवन मानणारा
कदाचित तो नसेल.

मराठी हृदयस्पर्शी प्रेम कविता

जीवनात अडचणी
तेव्हाच त्रास देतात मला
जेव्हा तुझा हात माझ्या हातात
नाही दिसत मला.

मराठी प्रेम कविता संग्रह

एक काळ निघून गेला
तुझ्यावर प्रेम करून
पण तुला आजही माहीत नाही
माझ्या मनात तू आहेस घर करून.

मराठी प्रेम कविता चारोळ्या

नसेल होणार तू माझी
तरी मला दुःख नाही
हे प्रेम आहे माझं
कोणती जिद्द नाही.

मराठी प्रेम कविता आठवण

कारणे तर त्रास देणाऱ्याला
मागितले जातात
जे खरं प्रेम करतात
ते विश्वास जपत असतात.

मराठी प्रेम कविता SMS

बोलणं सुरूच राहावं
गप्पा संपूच नये
डोळ्यात तुझ्या बघत रहावं
अन पापणी झुकूच नये.

प्रेम कविता मराठी शायरी

प्रेमात ज्यांनी अख्ख
आयुष्य बरबाद केलं
तेच म्हणतात, प्रेमात
काहीच नाही पडलेलं.

marathi love poem

जर मन एकच असेल
तर प्रेमही एकदाच करावं
जसं असेल तसं
आयुष्यभर जपावं.

prem kavita

एकट्यात हसू येणं
हे प्रेम असतं
एखादी गोष्ट सर्वांपासून
लपवणं हे प्रेम असतं.

marathi prem kavita

हृदय जीने जिंकलं
ती तोडू सुद्धा शकते
प्रेमाने भरलेल्या डोळ्यात ती
अश्रू सुद्धा आणू शकते.

marathi kavita on love

माझ्या मनाला
हे कळलच नाही
प्रेम तोपर्यंत चांगल असते
जोपर्यंत ते होत नाही.

premachi kavita

माझ्या प्रत्येक श्वासात
तू बसलेली आहेस
माझ्या प्रत्येक क्षणात
तू भरलेली आहेस.

first love poem in marathi

जोपर्यंत हृदयाला
श्वासाचा पुरवठा असणार आहे
तोपर्यंत मी फक्त
तुझ्याशीच प्रेम करणार आहे.

marathi charolya on love

कळत नाही मला
तुला नाही कसं म्हणावं?
श्वासाला नाही म्हणून
जीवन कसं जगावं?

marathi kavita for wife

जर माझं आयुष्य फुल असेल
तर तू त्याचा सुगंध आहेस
मी खळवळणारा सागर असू
तर तू त्याला शांत किनारा आहेस.

prem kavita marathi text

सोडून तू जाशील
तर तुला अडवणार नाही
मात्र माझ्या आयुष्यात
पुढचा दिवस उगवणार नाही.

romantic poem in marathi

प्रेमाची खात्री पाहिजे
तर सोडून बघ मला
पुढच्या क्षणी माझ्या गेल्याची
खबर मिळेल तुला.

marathi poem for love

तुला सोडून कधीच
जाणार नाही मी
तूझ्याविना आता एक क्षणही
जगणार नाही मी.

prem poem in marathi

तुझ्या माझ्यातलं अंतर
जेवढं वाढत आहे
आपल्या प्रेमाची पातळी
तेवढी रुजत जात आहे.

marathi charolya prem

तिच्या प्रेमाच्या नशेत
मी सावरलो नाही
तिने मला स्वकारलं नाही
मी सुद्धा कुणाचा झालो नाही.

heart touching marathi kavita

फुल मी असेल तर
त्याचा सुगंध तू आहेस
रात्र मी असेल तर
त्यामधील चांदण तू आहेस.

marathi premachi kavita

प्रेम माझं तुझ्यावरचं
कधीच कमी होणार नाही
जेव्हा असं काहीघडेल
तेव्हा मी असणार नाही.

marathi kavita

तुझ्यासाठी चंद्र, तारे
नाही आणू शकणार
मात्र तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद
कधी कमी नाही होऊ देणार.

marathi love poems for her

Leave a comment

x